डेस्कटॉपची ओळख- Introduction to desktop

Admin
By -
0

डेस्कटॉपची ओळख- Introduction to desktop

या घटकात आपण डेस्कटॉपची ओळख करून घेणार आहोत. डेस्कटॉप वरती ३ प्रकारचे आयकॉन पाहायला मिळतात. आयकॉन म्हणजे एक छोटासा चौकोन. या चौकोनात चित्र असतात व त्या चित्राखाली त्या चित्राचे नाव असणारे आयकॉन असते. उदा. धीस पि.सी. हे आयकॉन दर्शविताना धिस पि.सी. चे चित्र व त्या चित्राखाली दिस पिसी. असे नाव असते.

१. सिस्टम निर्मीत आयकॉन

२. प्लीकेशन संबंधी आयकॉन

३. पयोगकर्ता आयकॉन. (यउजर क्रियेटेड आयकॉन)

१. ॲप्लीकेशन आयकॉन (Application icon)

सर्वप्रथम आपण ऐप्ल्लीकेशन रीलेटेड आयकॉन म्हणजे काय ते पाहू. ॲप्लीकेशन शॉर्टकट आयकॉन म्हणजे जेव्हा संगणकात एखादे सॉफ्टवेअर स्थापीत (Instal) केले जाते व त्यानंतर त्या सॉफ्टवेअरचे आयकॉन संगणकात प्रदर्शित होते. अशा प्रकारच्या आयकॉनला "ॲप्लीकेशन शॉर्टकट आयकॉन असे संबोधले जाते.

उदा. जॉस (JAWS), एन्.व्ही.डि.ए. (NVDA) अथवा व्ही. एल्. सी. (VLC) मीडिया प्लेअर यांसारख्या सॉफ्टवेर्सना शॉर्टकट ॲप्लीकेशन आयकॉन म्हणून ओळखले जाते.

२.युजर क्रियेटेड आयकॉन (User created icon)

युजर क्रीयेटेड आयकॉन म्हणजे, पयोगकर्त्याद्वारे संगणकात निर्मान केल्या जाणाऱ्या फाईल किंवा फोल्डर्सना युजर क्रीयेटेड आयकॉन म्हणून संबोधले जाते.

उदा. पयोगकर्त्याद्वारे एखाद्या फोल्डरचे नाव दिले गेले त्या फोल्डरला युजर क्रियेटेड आयकॉन म्हणून ओळखता येईल. हे फोल्डर डेस्कटॉपवर दिसणे आवश्यक आहे.

३.सिस्टम क्रीयेटेड आयकॉन (System created icon)

सीस्टम क्रीयेटेड आयकॉन हे ज्या कंपनीचा संगणक असेल त्या कंपनीकडून झालेले असतात.

  • हे आयकॉन क्रीयेट केले जात नाहीत.
  • हे आयकॉन सेवा प्रदात्या कंपनीकडून उपलब्‍ध करून दिले  जातात.
  • डेस्कटॉपवर दिसणाऱ्या पांढऱ्या पट्टीस टास्क बार असे संबोधले जाते.
  • या पट्टीवर नेव्हीगेट केले जाऊ शकते.
  • डेस्कटॉपवरील अप व डाऊन ॲरोनच्या साह्याने दृष्टिबाधित व्यक्ती या आयकॉनवरून नेव्हीगेट करू शकतात.
  • अप व डाऊन ॲरो बरोबरच लेफ्ट व राईट ॲरो च्या साह्यानेही आपण डेस्कटॉपवरती नेव्हीगेट करू शकतो.
  • त्याचबरोबर टॅब (Tab) या बटणाच्या साह्यानेही आपण संगणकावरील आयकॉनवर नेव्हीगेट करू शकतो.
  • टॅब या बटणाने पुढील आयकॉन नेव्हीगेट करत असतांना जर आपणांस मागील आयकॉनवर जायचे असेल तर शिफ्ट अधिक टॅब ही दोन बटणे प्रेस करून आपण मागील आयकॉनवर पोहचू शकतो.
  • या पद्धतीने आपण संगणकावरील संपुर्ण यादी पुढे किंवा मागे जाऊन वाचू शकतो.

घटक २. दीस पि.सी (This PC)

या घटकात आपण दीस पि.सी. (This PC) या आयकॉनविषयी थोडक्यात माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही केवळ सैधांतीक माहिती असणार आहे. या माहितीच्या आधारे आपण तात्काळ संगणकावर प्रात्यक्षिकाद्वारे सराव करू शकाल.

  • दीस पि. सी. मध्ये साधारणत: सिस्टम क्रियेटेड फोल्डर व ड्राईव्हर असतात.
  • उदा. डेस्कटॉप, म्युजिक, डाऊनलोड, डॉक्युमेंट, यांसारखे फोल्डर पाहायला मिळतात.
  • या प्रत्येक फोल्डरला एक टास्क दिलेला असतो.
  • उदा. आपण संगणकात बायडीफॉल्ट सेव्ह करतो तेव्हा ती फाईल त्या त्या फोल्डरमध्ये बायडीफॉल्ट सेव्ह होते.
  • एखादी ल‍िखीत फाईल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होते तर यूट्यूब (YouTube) वरून अथवा गुगल (Google) वरून डाऊनलोड केलेली फाईल डाऊनलोडमध्ये सेव्ह होते.
  • या पद्धतीची कमांड आपण देऊ शकतो.
  • त्याचबरोबर आपल्या दीस पिसीमध्ये काही ड्राईव्हर पाहायला मिळतील.
  • उदा. सी. ड्राईव्ह, डी. ड्राईव्ह व ई. ड्राईव्ह
  • यांसारखे ड्राईव्ह आपणांस पाहायला मिळतील.
  • या ड्राईव्हचा वापर संगणकात माहिती साठविण्यासाठी केला जातो.
  • ही माहिती व्यवस्थीत तऱ्हेने साठविण्यासाठी या ड्राईव्हचा अपयोग केला जातो.
  • सी. ड्राईव्हमध्ये विशेषतः संगणक संचालन प्रोग्राम फाईल सेव्ह केल्या जातात.
  • संगणकासंबंधीचे सर्व महत्वपुर्ण सॉफ्टवेअर्स सी. ड्राईव्हमध्ये स्थापीत केले जातात.
  • डी. व इतर ड्राईव्हमध्ये सामान्य माहिती साठविली जाऊ शकते.
  • कपाटातील कप्पयांप्रमाणे या ड्राईव्हचा वापर आपण करून शकतो.
  • डीव्हीडी ड्राईव्ह हा ही या दीस पिसीमध्ये दर्शविला जातो.
  • साधारणतः पुर्वी वापरल्या जाणाऱ्या  पि.सी. मध्ये डि.व्ही.डी. ड्राईव्हचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे.
  • या ड्राईव्हमध्ये डि.व्ही.डी.(DVD)सेट्स प्ले (Play) केल्या जात असत.
  • डि.व्ही.डी. (DVD) कॆसेट्स प्ले करण्यासाठी हा ड्राईव्ह अपयोगी आहे.
  • वर्तमान काळात मायक्रो एस.डी. कार्डचा वापर होत असल्यामुळे या डिव्हीडी. ड्राईव्हचा वापर कमी झाला आहे.
  • आपण संगणकास जोडलेला पेन ड्राईव्ह, एस.डी. कार्ड अथवा स्मार्टफोन या दीस पिसीमध्ये दर्शविला जाऊ शकतात.
  • येथूनच आपण या ड्राव्हचा वापर करू शकतो.
  • कट, कॉपी, पेस्ट (Cut, Copy, Paste) या पर्यायांसाठी दीस पि.सी. या मेन्यूमध्ये  यावे लागते.
  • या ड्राईव्ह आणि फोल्डरमध्ये काय काय सेव्ह केले जाऊ शकते हे निश्चीत केले गेले आहे.

दीस पि.सी. मध्ये प्रवेश करण्याचे दोन मार्ग आहेत.

  • सर्च बॉक्सच्या माध्यमातून आद्याक्षरांच्या आधारे.
  • डेस्कटॉपच्या माध्यमातून सेव्ह फाईलपर्यंत पोहचणे.

१. डेस्कटॉपच्या माध्यमातून फाईलपर्यंत पोहचणे

  • सर्च बॉक्सच्या माध्यमातून सर्वप्रथम विंडोज-डी. हे  बटण प्रेस करूया.
  • मग तिथे डेस्कटॉप हा मेन्यू ओपन होईल.
  • त्यानंतर दीस पि.सी. मध्ये जाण्यासाठी टी (T) हे बटण प्रेस करूया.
  • त्यानंतर दीस पि.सी. वर फोकस जाऊन हा दीस पि.सी. आयकॉन ओपन होईल.
  • त्यानंतर उघडलेल्या दीस पिसी. मध्ये आपणांस हवा तो फोल्डर शोधू शकू.
  • या यादीत वेगवेगळे फोल्डर प्रदर्शित होतील.
  • उदा. लोकल ड्राईव्ह, डाऊनलोड ड्राईव्ह, डॉक्युमेंट ड्राईव्ह
  • यांपैकी आपल्याला जो फोल्डर हवा आहे त्यावर इंटर हे बटण प्रेस  करून आपण हव्या त्या फोल्डरमध्ये प्रवेश  करू शकतो.
  • इथे आपणांस गोरे हे फोल्डर हवे आहे.
  • पहिल्यांदा आपण या फोल्डरचा शोध घेऊ.
  • हे फोल्डर सापडताच आपण त्यावर इंटर हे बटण प्रेस करूया.
  • हे फोल्डर बंद करण्यासाठी आपण अल्ट+ एफ.४ (Alt+F4) ही बटणे प्रेस करून हे फोल्डर बंद करू शकतो.
  • आपण आता दुसऱ्‍या मार्गाने फोल्डर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

२. आद्याक्षरांद्वारे फोल्डरचा शोध घेणे

  • आपण आपल्या संगणकाच्या की-बोर्डवरील विंडोज की प्रेस करताच सर्च बॉक्स ओपन होईल.
  • त्यानंतर सर्च बॉक्समध्ये TH ही अक्षरे टाईप करताच दीस पि.सी. हे आयकॉन प्रदर्शीत होईल.
  • त्या दीस पि।सी।वर आपण इंटर हे बटण प्रेस  केल्यास दीस पि.सी. हे आयकॉन ओपन होईल.
  • त्यानंतर आपण डाऊन रोच्या साह्याने विविध फोल्डर पाहू शकतो.
  • अशाप्रकारे आपण हवे ते फोल्डर शोधू शकतो.

डेस्कटॉपची ओळख- Introduction to desktop हा ब्लॉग आपणास आवडला असल्यास वेबसाईटला सबस्क्राईब करून जास्तीत मित्रांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे.


Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Share & Comments

टिप्पणी पोस्ट करा (0)