Typing Speed कशी वाढवावी- How to increase typing speed

Admin
By -
1

Typing Speed कशी वाढवावी- How to increase typing speed

कॉम्प्युटरचा शोध लागल्यापासून ते आजपर्यंत या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन नवनवीन टीप्स ॲन्ड ट्रीक्सचा वापर करून संगणकावरील ‍कामे कमी वेळेत अत्यंत सुलभ पद्धतीने केले जात आहेत. एक महिन्याचे काम काही दिवसात करणे संगणकामुळे शक्य झालेले आहे. यामध्ये अपवाद टायपींग हा घटक महत्त्वाचा असून ज्यांची टायपींग स्पीड चांगली तोच जास्तीत जास्त कामे कमी वेळेत करू शकतो अशी मानसिकता तयार झालेली आहे.

आजकाल प्रत्येकजण Typing Speed वाढण्यासाठी अनेक वेळा आपापल्या परीने प्रॅक्टिस सुरु करतात, पण काही जण चुकीच्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. त्यामुळेच त्यांची Typing Speed कधीच वाढत नाही. यामुळे त्यांना Typing Speed वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असते.

सध्याच्या संगणकीय युगात प्रत्येक काम संगणकावर आधारित झालेले आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कामामध्ये टायपींग किंवा डाटा एंट्रीचे कामे करावे लागतात. यामुळे जर टायपींग स्पीड उत्तम व चांगली असेल तर कमीत कमी वेळेत संगणकावर अधिक काम करतात येते.

Typing Speed कशी वाढवावी (How to increase typing speed) या लेखामध्ये
तुम्हांस घेऊन आलो आहे
Typing Speed वाढवण्याच्या उपयुक्त ७ टिप्स, त्यामुळे तुम्हांला तुमची Typing Speed प्रभावीपणे वाढविणे शक्य होईल. त्याचबरोबर
काम करण्याची शैलीत चांगल्या प्रकारे वाढ करता येईल. कार्यालयीन किचकट कामे कमी वेळेत करता येतील.    

1) Keyboard VAR MIDDLE ROW or HOME ROW

या पद्धतीचा उपयोग केल्यास चांगल्या प्रकारे स्पीड वाढविता येते. Typing Speed वाढवण्यासाठी सर्वात पहिले आपणास keyboard ची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

जर आपण कीबोर्ड व्यवस्थित पाहिल्यास, तर F आणि या दोन्ही अल्फाबेट वर एक वाढलेली लाइन दिसेल, जी कीबोर्ड ची Middle Row किंवा Home Row असते.

म्हणजे जेव्हाही आपण टाईपिंग करत असाल तर तुमची बोटे या दोन्ही वर आणि बाकी ची बोटे या Home Row वर असली पाहिजे आणि आपणास पुन्हा पुन्हा कीबोर्ड वर हे बघण्याची आवश्यकता पण नाही पडणार कि तुमची बोटे कीबोर्ड वर कोणत्या Keys वर आहे.

Home Row वर Finger अशी ठेवली पाहिजे, जसे मी आपणास दाखवले आहे लेफ्ट हैंड वरून सुरवात करूया.

Little Finger – “Aवर राहीलत्याच्या नंतर रिंग फिंगर (Ring Finger) – “Sवर मिडिल फिंगर (Middle Finger) – “Dवरफर्स्ट फिंगर – “Fवर राहील.

त्याच प्रकारे उजव्या हाता (Right Hand) ची देखील बोटे (Fingers) आपणास J”, “K”, “Lआणि “;” वर ठेवली पाहिजे.

अशा प्रकारे, सुरुवातीचा काही दिवसा मध्ये आपणास Middle Row ची प्रैक्टिस करावी लागेल यासाठी, ऑनलाइन टायपिंग च्या वेग वेगळ्या वेबसाइट्स आहेत ज्याने आपण त्याची प्रैक्टिस करू शकता, जे First Finger आहे, त्यानेच आपणास Gआणि H” कीज ला प्रेस करायचे आहे.

2) Keyboard Var TOP ROW Or BOTTOM ROW

आता आपण मिडिल रौ (Middle Row) पाहिले आहे ह्याचा नंतर आपणास टॉप रौ (Top Row) आणि बॉटम रौ (Bottom Row) ची प्रॅक्टिस करावी लागेल.

त्यासाठी आपणास असे प्रकारे फिंगर सेट करावे लागेल. टॉप रौ (Top Row) साठी डाव्या हाता (Left hand) ने सुरुवात करूया.

लिटिल फिंगर (Little Finger) – “Qवर राहील,

त्याचा नंतर रिंग फिंगर (Ring Finger) – “Wवर ,

मिडिल फिंगर (Middle Finger) – “Eवर ,

आणि फर्स्ट फिंगर (First Finger) – “Rवर राहील,

आणि ठीक त्याच प्रकारे उजव्या हाता (Right hand) चे पण फिंगर्स आपणास U” ,
I”, “O”, आणि Pवर राहील.

आता बॉटम रौ (Bottom Row) साठी डाव्या हाता (Left hand) ने सुरवात करूया.

लिटिल फिंगर (Little Finger)- “Z” वर राहील,

त्याचा नंतर रिंग फिंगर (Ring Finger) – “X” वर,

मिडिल फिंगर (Middle Finger) – “C” वर,

आणि फर्स्ट फिंगर (First Finger) – “V” वर राहील,

येथे ह्या इमेज मध्ये आपण बघू शकता कोणत्या इमेज अल्फाबेट साठी कोणते फिंगर वापरायचे आहे आणि मग असेच आपणास टॉप रौ (Top Row) आणि (Bottom Row) ची पण प्रॅक्टिस करायची आहे पुन्हा पुन्हा ही कीज टाईप करावी लागेल.

3) Keyboard कडे पुन्हा पुन्हा पाहू नये

टायपिंग करता वेळी आपणास कीबोर्ड वर पुन्हा पुन्हा नाही पाहायचे आहे. फिंगर्स ला सेट केल्या नंतर आपण त्याला हळू हळू टाईप केले तरी चालेल, पण आपणास कीबोर्ड वर नाही पाहायचे आहे. जे पण कीज़ आपण टाईप करत आहे ते आपणास तुमच्या मनात पण बोलायचे आहे.

आता आपण म्हणाल त्याने काय होणार? याच्या मदतीने तुमचे Subconscious Mind लक्षात ठेवेल की कोणती फिंगर कोणत्या कीज वर असावी कारण टायपिंग हे फक्त
हातांचे काम नाही
, ते दिसते हाताचे पण काम मेंदूचे आहे कारण मेंदूच हातांना सिग्नल पाठवत असतो.

4) Typing टायपिंग करण्यासाठी कसे बसायचे असतात?

हे खूप इम्पॉर्टन्ट आणि महत्वाची गोष्ट आहे. कारण टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी आपणास खूप तासा (Hours) ची प्रॅक्टिस लागते. आपण कधीही पुढे वाकून टाइप करण्याचा प्रयत्न करू नका.

Computer ची स्क्रीन आणि तुमचा मध्ये सुमारे ४५ सेंटीमीटर अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचा पाम 90 डिग्री मधेच ठेवा, जास्त वर किंवा खाली ठेऊ नका.

Screen Brightness तुमच्यानुसार अड्जस्ट करून घ्याजास्त आणि कमी ब्राइटनेस मुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

5) Sentence Practice

टॉप रौ (Top Row), होम रौ (Home Row) आणि बॉटम रौ (Bottom Row) ह्या
सर्वां ची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपणास ह्या सेन्टेन्स ची प्रॅक्टिस केली पाहिजे
THE
QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG

ह्या सेन्टेन्स ची खास गोष्ट हे आहे कि यामध्ये A TO Z हे सर्वे अल्फाबेट येतात तर नोटपॅड ओपन करा आणि चालू करा ह्या Sentence ची प्रॅक्टिस.

6) SHIFT and ENTER Button Practice

प्रत्येक वर्ड चा पहिला अल्फाबेट कॅपिटल म्हणजे मोठा असतो. तर आपणास नीट लक्षात ठेऊन Shift बटण सोबत प्रत्येक अल्फाबेट ला टाईप करून प्रॅक्टिस केली पाहिजे. लक्ष ठेवा जेव्हा आपण डाव्या बाजू (Left Side) च्या अल्फाबेट टाइप करत आहे तर उजवा (Right) चा Shift बटण प्रेस करा आणि उजव्या (Right Side) चा अल्फाबेट साठी डावा (Left) चा Shift बटन.

आणि त्याच वेळी, उजव्या बाजूला (Right Side) Enter आणि Shift बटणा जवळ जे कीज आहे त्यांचे वेगळे प्रॅक्टिस करा कारण ते पण सेन्टेन्स मध्ये आल्या नंतर लगेच तुमच्या मेंदू मधून सिग्नल पास होईल आणि तुमचा कडून ते टाईप झाले पाहिजे. 

7) Patience आणि Concentration

आता जास्त जोऱ्यात फ़्रस्टेड (Frustrate) होऊन टाईप करण्या ने टायपिंग स्पीड नाही
वाढणार उलट टायपिंग ची एक्यूरेसी (
Accuracy) कमी होईल.

ह्याच्यासाठी कीबोर्ड वरून बोटानं ला हलक्या हाताने चालवा आणि नखा ने टाईप करण्याचा प्रयत्न करू नका. टाइपिंग करता वेळी कोणा सोबत बोलू नये आणि जो सेन्टेन्स किंवा वर्ड आपण टाइप करत आहे त्याचा पुढे येणारे वर्ड ला दिमाका मध्ये स्कॅन करून घ्या. अशाप्रकारे, जर आपण कठोर मेहनत आणि भक्ती सोबत आपण टायपिंग ची प्रैक्टिस लगातार करतात तर तुमची पण स्पीड खूप लवकर वाढेल.

Typing Speed कशी वाढवावी या लेखामध्ये आपणास Typing Speed वाढवण्याच्या उपयुक्त ७ टिप्स दिलेल्या आहेत. ज्यामुळे तुमची Typing Speed प्रभावीपणे वाढविणे शक्य होईल. त्याचबरोबर काम करण्याची आवड निर्माण होईल व तुमच्या कामाची गौरव केला जाईल.  

Benefit of Typing Speed- टायपिंग गतीचा फायदा

1. वेळेची बचत होते

टाईप शिकण्याचा कदाचित सर्वात स्पष्ट फायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा (आणि त्यांच्या कंपनीचा) बराच वेळ वाचतो. सरासरी दोन बोटांचे टायपिस्ट, प्रति मिनिट 10 शब्दांच्या गतीने, सुमारे 17 मिनिटांत 170-शब्दांचा विभाग टाइप करेल. दुसरीकडे, एक टच टायपिस्ट, सरासरी 60 शब्द प्रति मिनिट टाइप करतो, तोच विभाग सुमारे 4 मिनिटांत टाइप करू शकतो.

2. आरोग्य चांगले राहते

तुमच्या आरोग्यासाठी टायपिंग देखील चांगले आहे. तुम्ही योग्य की शोधत असताना ते तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर वाकण्यापासून प्रतिबंधित करते. त्याऐवजी, तुमचे डोळे तुमच्या समोरच्या स्क्रीनवर केंद्रित राहतात. बरोबर टायपिंग केल्याने चांगल्या स्थितीला प्रोत्साहन मिळते आणि मानेचा किंवा पाठीचा ताण टाळता येतो.

3. काम करतांना थकवा कमी येतो.

टायपिंग हे मेंदू आणि शरीर दोन्हीसाठी थकवणारे असते जेव्हा तुम्हाला ते दीर्घकाळ करावे लागते. टायपिंगमुळे हा मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होतो कारण ते तुम्हाला टायपिंग करण्याऐवजी तुम्हाला टाइप करू इच्छित असलेल्या सामग्रीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते.  

4. मजकूर निर्मितीची गती वाढण्यास मदत होते.

एक कुशल टायपिस्ट विशिष्ट वेळेत लेखन कार्य पूर्ण करण्यास सक्षम असतो आणि त्याच्या कमी टायपिंग गतीमुळे त्याला अडथळा येत नाही. म्हणून, जे उमेदवार जलद टाईप करायला शिकतात ते नियोक्त्यांना अधिक अनुकूल असतात. हे हमी देते की ते कंपनीसाठी (आणि कमी वेळेत) अधिक मजकूर तयार करू शकतात.

5. अचूकता व शुद्धता

टायपिंग टायपिस्ट तयार केलेल्या कामाची अचूकता सुधारते. कारण कीबोर्डवरील सर्व अक्षरांच्या स्थानाशी ते अत्यंत परिचित आहेत. अशा प्रकारे, कमी चुका आहेत आणि चुका खूप लवकर सुधारल्या जातात. हे कर्मचार्‍यांचा त्यांच्या कामावरील आत्मविश्वास देखील वाढवते आणि कंपनीच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

6. कामाच्या ठिकाणी ग्रोथ होते

पटकन टायपिंग करण्याच्या सर्व वैयक्तिक फायद्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे एकूण कार्यस्थळ उत्पादकता नाटकीयरित्या वाढली आहे. कर्मचार्‍यांमध्ये अधिक ऊर्जा असते, ते अधिक जलद गतीने उच्च-गुणवत्तेचे काम करण्यास सक्षम असतात आणि कमी चुका करतात. ते इतर प्रकल्पांसाठी अधिक वेळ घालवतात आणि संवाद सुधारतात.  

- Kishor Sasane, Latur

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

Please Like, Share & Comments

टिप्पणी पोस्ट करा